चंद्रपूर: 21नोव्हेंबर
भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त, संविधानाच्या समर्थनार्थ आणि सन्मानार्थ, चंद्रपूर येथे भव्य ‘संविधान सन्मानाचा, आधार बहुजनांचा’ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता न्यू इंग्लिश ग्राउंड, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे होणार आहे.
या सोहळ्याला आद. डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.
कार्यक्रमात संविधानाचा विचार आणि संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘भीम आवाज’ फेम, रॅपर विपिन तातड (झुंड फिल्म फेम) आणि रॅपर माही जी (भीम आवाज, मुंबई) यांची जोशपूर्ण सादरीकरणे होणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता गौरकर, रुपाली वानखेडे, रक्षा वानखेडे, आणि वेदिका वानखेडे हे सह-आयोजक म्हणून विशेष परिश्रम घेत आहेत.
हा ऐतिहासिक सोहळा संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या आधारस्तंभाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.




