अहेरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! आल्लापल्लीत दोन आत्राम नेत्यांची ‘गळाभेट’राजकीय चर्चाना उधान?

0
9
Oplus_16908288

आल्लापल्ली: गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. राजकीय विरोधक असलेले विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांचे राजकीय विरोधक माजी आमदार दीपक आत्राम यांचीवआल्लापल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही भेट केवळ औपचारिक नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘चहापानावर’ महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत.सत्ताधारी आणि विरोधक एकाच टेबलावर!

माजी आमदार दीपक आत्राम यांच्या निवासस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट दिली. धर्मराव बाबा आत्राम यांचे दीपक आत्राम यांनी शाल व श्रीफळ देऊन सहर्ष स्वागत केले. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात गळाभेट घेतली.

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा या भेटीच्या वेळेवर आणि विषयावर होत आहे. सूत्रांनुसार, या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुकीवर सखोल चर्चा झाली.

आगामी राजकीय नांदी चे संकेत: विरोधक कोणाविरुद्ध एकत्र?

विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम हे सध्या महायुतीतील (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) महत्त्वाचे नेते आहेत, तर दीपक आत्राम यांचा गडचिरोलीच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. दोघांची ही एकत्र मोट बांधली गेल्याने आगामी राजकारणात मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावण्याचे मुख्य कारण हे आहे की, हे दोन्ही विरोधक नेमके कोणाविरुद्ध रणनीती ठरवण्यासाठी एकत्र आले?

स्थानिक भाजपला आव्हान? आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची महायुतीतील स्थानिक भाजप नेत्यांसोबतची कथित नाराजी पाहता, स्थानिक भाजपच्या काही गटांना निवडणुकीत शह देण्यासाठी ही रणनीती असू शकते.

विरोधी पक्षांना (काँग्रेस, शिवसेना-उबाठा) रोखण्यासाठी? किंवा गडचिरोलीतील काँग्रेस आणि शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाव कमी करण्यासाठी हे दोन्ही नेते स्थानिक पातळीवर एकत्र आले असावेत.

या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद निश्चितपणे उमटतील. गडचिरोलीतील राजकारणाची दिशा आता कोणती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र,आल्लापल्ली-वेलगुर जीप क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गा साठी राखीव असल्याने सर्वसहमतिने या ठिकाणी विद्यमान प्रतिनिधित्व करणाऱ्याउमेदवारा विरुद्ध विरोधी पक्षाच्या उमेदवार असला पाहिजे या साठी ही भेट असल्याची राजकीय वर्तुलात चर्चा आहे.