दुर्गम भागातील आदिवासी जनतेच्या चेहऱ्यावर फुलले हसु.. माँ विश्वभारती सेवा संस्था व व्यापारी संघटना आलापल्लीच्या सहयोगाने एक दिवाळी..आपल्या लोकांसोबत  राबविला उपक्रम

0
4

अहेरी:20 ऑक्टोबर

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून वंचित आहेत.या ठिकाणी जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही त्यामुळे ईतर सोई सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या या भागात आल्लापल्ली येथील माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या कार्यकत्यांनी, व व्यापारी संघटनेच्या सहयोगाने या भागातील आदिवासी जनतेसोबत एक दिवाळी आपल्या लोकांसोबत उपक्रम राबवून येथील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले.

 अहेरी तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या कमलापूर परिसरातील नैनेर, आसा, मद्गु  आदी. गावात   माँ विश्वभारती सेवा संस्थेच्या कार्यकत्यांनी पोहोचून दिवाळी फराळ, नवीन कपडे वाटप केले.त्यासोबतच  गावातील जनतेला ,शाळकरी मुलांना ,आबालवृद्ध  लोकांना स्वयंसेवी संस्थे च्या वतीने दिवाळी फराळ व नवीन कपडे वाटप करण्यात आले.

यावेळी माँ विश्वभारती सेवा संस्थे चे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, सामाजिक कार्यकर्ते सुदीप रंगुवार, सुधाकर बंडावार,मिलिंद खोंड,  मिथुन चंद्रागडे, मनीष रणदिवे,त्रिशूल डांगरे,निपुल  आदीची उपस्थिती होती.