अहेरी:
“हर घर फल का पेड” या अभियानाअंतर्गत मियाम चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत मोद्दुमोडगू येथील आनंद आश्रम या वृद्धाश्रमाच्या आवारात ट्रस्ट च्या स्वयंसेवकाच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग मुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.बेसुमार वृक्षतोड व वाढत जाणारे प्रदूषण यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून ऋतू चक्रावर याचा परिणाम होत आहे.पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे.त्यामुळे महापुरा सारख्या त्रासदी ला सामोरे जावे लागते.हे कमी करायचे असेल तर वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे.
यावेळी बोर,आंबा,पेरू, कडुलिंब, लिंबू, फणस,चंदन, गुलमोहर, अशोक, खिरणी,सीताफळ आदी.वृक्षाची लागवड करन्यात आली.
यावेळी ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना फळ,मिठाई चे वितरण सुद्धा करण्यात आले.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक प्रतीक येनमवार,मियाम चे जिल्हा समनव्यक रोहित तरेवार, पंकज पोटे, महेश लोने, मंगेश आत्राम, माँ विश्वभारती सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे ,सोनू मडावी,आदींची उपस्थिती होती.




