अहेरी:दि.24 जून
राज्य शासनाने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या विविध आश्वासनाची पूर्तत्ता न होत असल्याने याविरोधात तसेच इतर स्थानिक विषयांना घेऊन क्या हुवा तेरा वादा असा नारा देत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात कालपासून आलापल्ली येथे सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू होते.
काल सकाळपासून हे ठिय्या आंदोलन सुरू होते काल अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी भेट देऊन भाग्यश्री आत्राम तथा इतर आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र यास यश आले नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अतुल वांदिले,वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत हे आज यात सहभागी झाले होते.
लाडकी बहीण योजना आणि निराधार योजना दरमहा पंधराशे वरुण एकेविसशे करण्यात यावे, डी.बी.टी.च्या नावावर संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान बंद करण्याचे थांबवून पूर्ववत सुरू करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, धानाला प्रतीहेक्टर 25 हजार बोनस देण्यात यावे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना पंधरा हजार मानधन देण्यात यावे, आलापल्लीतील पिण्याच्या पाण्याची समस्या,रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्वरित रस्त्यांचे कामे करण्यात यावे, वनहक्काचे पट्टे त्वरीत देण्यात यावे या व अन्य विविध मागण्या घेऊन ठिय्या आंदोलन काल पासून भरपावसात सुरू होते.
अहेरी चे अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले यांनी आज दुपारी आंदोलनस्थळी भेट दिली.तसेच यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी,पोलिस निरीक्षक हर्षल एकरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,विद्युत विभागाचे,संवर्ग विकास अधिकारी,यांनी भेट देऊन सर्व आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले.
अप्पर जिल्हाधकारी संजय आसवले यांनी भाग्यश्री आत्राम यांना निंबू सरबत पाजून ठिय्या आंदोलन थांबविले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम,युवानेते ऋतुराज हलगेकर,राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष प्रकाश ताकसांडे,श्रीनिवास विरगोनवार,सांबय्या कंबालवार,विनोद चव्हाण, जहीर हकीम,उमेश मोहुर्ले,अमोल मुक्कावार,श्रीनिवास चटारे,आल्लापल्ली ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार ,अब्दुल रहमान यांच्यासह अनेक.महिला पुरुष उपस्थित होते.




