अहेरी
: येत्या 23 जून सोमवार रोजी क्या हुवा तेरा वादा?? म्हणत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणार अशी माहिती शुक्रवार 20 जून रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिली.
पत्रकार परिषदेत सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केले, सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही. उलट संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेचे व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही जनता हवालदिल झाले असून ढोंगी महायुती सरकारला आश्वासनाची पूर्तता करण्याकरिता आलापल्ली येथील शहिद वीर बाबुराव शेडमाके चौक येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.
पत्रकार परिषदेत रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचे म्हणताच , पत्रकारांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी अहेरी येथील मुख्य चौकात उपोषण करण्यात आले, त्यात 31 मार्च पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता “लेखी” स्वरूपात देताच उपोषण मागे घेण्यात आले. पण रस्त्याचे काम मात्र जैसे थे व थंडबस्त्यात आहे, यावर लेखी स्वरूपात देऊनही आणि 31 मार्च निघून गेल्यानंतरही सबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई झाली व त्यानंतर तुमची भूमिका काय होती? या प्रश्नावर मात्र पत्रकार परिषदेत समाधानकारक उत्तर पत्रकारांना मिळाले नाही.
पुढे पत्रकार परिषदेत, लाडकी बहीण योजना आणि निराधार योजना दरमहा पंधराशे वरुण एकेविसशे करण्यात यावे, डी.बी.टी.च्या नावावर संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान बंद करण्याचे थांबवून पूर्ववत सुरू करावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, धानाला प्रतीहेक्टर 25 हजार बोनस देण्यात यावे, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना पंधरा हजार मानधन देण्यात यावे, रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्वरित रस्त्यांचे कामे करण्यात यावे, वनहक्काचे पट्टे त्वरीत देण्यात यावे या व अन्य विविध मागण्या घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक अमोल मुक्कावार, जहीर हकीम, अप्सर पठाण, हिमायत अली, स्वप्नील श्रीरामवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




