अहेरी:
डॉ. किशोर नैताम फाउंडेशन द्वारा आयोजित उन्हाळी शिबीराचे उद्घाटन ( फ्लॉय फ्री समर कॅम्प )जिल्हा परिषद कन्या शाळा आल्लापल्ली येथील प्रांगणात करण्यात आले .
यावेळी उद्घाटक म्हणून आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, अध्यक्ष म्हणूनसेवानिवृत्त वनपाल रावजी नैताम,
ज्योती ढोके एडवोकेट अहेरी , डॉ . अलकाताई उईके वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव ,खुर्शिद शेख राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,राजू कर्मे ,व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड, पत्रकार महेश गुंडेट्टीवार आदीची
उपस्थिती होती.
शिबिरामध्ये ध्यान मेडिटेशन कु . शैलजा गोरेकर कु .शालिनी खोब्रागडे झुम्बा डान्स कु . रूपाली एर्रावार एरोबिक्स एक्सरसाइज श्री मुकुंद चंद्रजी सडमेक गोंडी नृत्य गणेश कोरसा योगा आणि कराटे रवी भांदककर आर्ट अँड क्राफ्ट श्री विनोद धर्मराव खांडेकर शिकविणार असून बांबू आर्ट श्री मोतीराम गावडे शिकविणार आहेत या दरम्यान वार्म अप, नैसर्गिक सहल ,वारली पेंटिंग, माती पासून दागिने बनविणे, मुर्ती कला, फिल्म मेकिंग ऑनलाईन वर्कशाप, स्टोरी टेलिंग ,नाट्य चर्चा, मूकनाट्य, ऑनलाईन वर्कशाप खजीना शोध लँड रिस्टोरेशन ऑनलाइन वर्कशॉप मा . रजनिश द्वारा ग्रुप डिस्कशन ऑन जेंडर बाइअस मार्गदर्शक डॉक्टर समता मडावी ऑनलाइन इंटरव्यू डॉक्टर शिप्रा उके अँड दास .बायो एन्झाईम वर्कशॉप आनंद मेळावा आणि कला बाजार असा हा भरगच्च पंधरा दिवसाचा कार्यक्रम आयोजित असून.6ते 15 वयोगटातील बच्चे कंपनीने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमती किशोर नैताम यांनी केले .संचालन ममता वरखडे यांनी तर आभार मुकुंद सडमेक यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता धनश्री कोतकोंडावार, सुप्रतिका बोगुलवार ,मेघाश्री मडावी,वैष्णवी कोरेत ,नागमणी , गणेश कोरसा,रोशना नरोटे, शारदा मट्टामी , अश्विनी ,छकुली सोयाम,पृथा एर्रावार आद्या गलबले यांनी विशेष परिश्रम घेतले.




