अहेरीwww.thegotul.com.. शिक्षक दिनाचे नियमित्ताने स्पंदन फाउंडेशन गडचिरोली तर्फे महाराजा लान मध्ये आयोजित केलेले कार्यक्रमात चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाकूरनगरचे उपक्रमशील शिक्षक राजेश सरकार यांना गडचिरोली जिल्ह्याचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या हस्ते स्पंदन फाउंडेशन चे स्मृतिचिन्ह ,शाल तसेच वृक्षाचे रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.
सरकार सर यांचे अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाकूरनगर चे इयत्ता पाचवी चे बांगला माध्यमाच्या चार विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमात शिष्यवृत्ती परीक्षेत बसवून पास करवणाऱ्यांच्या हिम्मत दाखवले त्यामुळे सरांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वत्र कौतुक होत आहेत.




