संकट मोचन हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने अहेरीतील वातावरण भक्तीमय

0
2

अहेरी 11सप्टेंबर:-
अहेरी शहरातील प्रभाग क्रमांक 03 येथे नुकताच संत मानव दयाल गणेश मंडळाच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या संकट मोचन हनुमान मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्याचे पौरोहित्य सागर महाराज यांनी केले. त्यांनी मंत्रोच्चारांच्या घोषात मंदिरातील मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. या पूजनाचा मान विलास पोलोजवार दांपत्य, दिगंबर अमलपुरीवार दांपत्य, तोकलवार साहेब दांपत्य आणि संतोष दुरशेट्टीवार दांपत्य यांना मिळाला.
मंदिराच्या उभारणीसाठी आणि हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये सचिन येरोजवार, प्रशांत कटलावार, शंकर कटलावार, दीपक गनमुक्कुलवार, कृष्णा पोलोजवार, राजू मुरमूरवार, शनगरवार काका, संतोष पोनलवार, ब्रम्हय्या, छायाताई, संतोष दुरशेट्टीवार आणि रवी संगोजी यांचा विशेष सहभाग होता.
या पवित्र सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हनुमानाचे दर्शन घेतले आणि सोहळ्याचा आनंद घेतला. या मंदिर स्थापनेमुळे प्रभाग क्रमांक 03 च्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.