आझाद गणेश मंडळ अहेरी वतीने च्या दिव्यांगाना वस्त्र वाटप

0
20

अहेरी :3सप्टेंबर
अहेरी येथील उपक्रमशिल गणेश मंडळ म्हणून आझाद गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवित असतात.
या गणेशोत्सवात आझाद गणेश मंडळ अहेरी यांच्या वतीने अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या हस्ते दिव्यांग बंधू-भगिनींना वस्त्रवाटप तसेच भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात राकेश कारेंगुलवार, अनिल पारधी, धनंजय कविराजवार, राकेश मडावी, रामू मडावी, नागराज संतोषवार, गणेश पेंदाम, अक्षय दुर्गे, केतम्मा सापीडवार, माया गेडाम, ज्योती बेजनवार, ललिता टेकाम तसेच अनेक दिव्यांग बांधव-भगिनी उत्साहाने उपस्थित होते.

या उपक्रमात आझाद गणेश मंडळाचे सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते.