संप काळात बाईक रॅली काढून आरोग्य कर्मचाऱ्यांचे डेंगू व मलेरिया आजारावर जनजागृती.

0
245

अहेरी-26ऑगस्ट

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन बाबत दिनांक19.08.2025 पासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी येथील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका व इतर अधिकारी कर्मचारी यांनी. संप काळात सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनात डेंगू व मलेरिया बाबत जनजागृती करण्याकरिता आज दिनांक 26.08.2025 रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

सदर बाईक रॅली अहेरी व आलापल्ली येथे फिरून लोकांमध्ये डेंगू व मलेरिया बाबत जनजागृती करण्यात आली. सदर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या रॅलीला लोकांकडून उत्सुक प्रतिसाद लाभला आहे. अशा अभिनव उपक्रमामुळे लोकांना याचा निश्चितच फायदा होईल अशी शक्यता आहे.