अहेरी:26ऑगस्ट
आगामी दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सव, ईद -ए-मिलाद व
विविध सणाच्या पार्श्वभूमीवर अहेरी पोलीस ठाण्याच्या वतीने, मंगळवारी संध्याकाळी अहेरी व आलापल्लीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
निलोत्पल पोलीस अधिक्षक गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली (अभियान) श्री. एम. रमेश , अपर पोलीस अधिक्षक अहेरीश्री. सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनात व श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, व पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या उपस्थिती मध्ये हा रूट मार्च काढण्यात आला.
आलापल्ली येथील सावरकर चौक, श्रीराम चौक, बस स्टॅन्ड, विर बाबुराव सडमेक चौक, पोलीस चौकी आलापल्ली दरम्यान रुट मार्च काढण्यात आला. तसेच अहेरी येथील हॉकी ग्राऊन्ड, दानशुर चौक, आझाद चौक, मस्जिद चौक, पोलीस स्टेशन अहेरी चौक, गांधी चौक, राजवाडा रोड, आईचवार दुकान गल्ली, दानशुर चौक पर्यंत रुट मार्च काढण्यात आला.
गणेशोत्सव आणि येत्या सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहेरी पोलिसांकडून विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या रूट मार्चमध्ये सपोनि मंगेश वळवी, सपोनि देवेंद्र पटले, पोउपनि चैतन्य घावटे, पोउपनि दिनेश येवले, पोउपनि सुनिल पवार, मपोउपनि करुणा मोरे, मपोउपनि दिपाली कांबळे, तसेच पोलीस स्टेशन अहेरी येथील ४८ पोलीस अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथील ०५ अंमलदार, दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस उप मुख्यालय प्राणहीता येथील २० अंमलदार, पुरुष व महिला ५० होमगार्ड उपस्थित होते.




