गडचिरोली:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकरीता दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान तिन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ परीसरामध्ये करण्यात आलेले होते. सदर महोत्सवामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, रस्साखेच, दौडस्पर्धा, संगीत खुर्ची व बॅडमिंटन या क्रीडा स्पर्धांचा तसेच समुह व एकल गीत गायण, समुह व एकल नृत्य, लघु नाटिका व एकपात्री नाटिका या कला प्रकारांचा समावेश होता.
क्रीडा प्रकारातील क्रीकेट या खेळाचे संपुर्ण सामने हे राष्ट्रीय शारीरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आलेले होते. सदर महोत्सवामध्ये विद्यापीठाचे व विविध संलग्नीत महाविद्यालयांचे मिळून जवळपास 400 ते 450 महिला व पुरूष कर्मचारी सहभागी झाालेले होते.
तिन दिवसीय क्रीडा व कला महोत्सवाचे समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी विद्यापीठाच्या नुतन सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी होते. तसेच झाडीबोली नाट्य कलावंत डॉ. राजकुमार मुसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मंचावर क्रीडा संचालीका डॉ. अनिता लोखंडे, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष श्री. महादेव वासेकर, संघटनेचे पदाधिकारी तथा महासंघाचे सचिव श्री. प्रविण पहानपटे, महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत खोके, सचिव श्री. अरूण जुनघरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन श्री. योगेश सोपनकर व श्री. प्रशांत पुनवटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिनेट सदस्य श्री. सतिश पडोळे यांनी केले.
सदर महोत्सवातील विविध क्रीडा व कला प्रकारांमध्ये विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी हिरहिरीने सहभाग घेत रस्साखेच स्पर्धेत प्रथम, व्हॉलीबॉल स्पर्धेत व्दितीय, खोखो महिला गटात प्रथम, रस्साखेच महिला गटात व्दितीय, तसेच बॅडमिंटन डबल स्पर्धेत पुरूष गटात प्रथम श्री. घनशाम वाघरे व श्री. प्रशांत खंडाळकर तर व्दितीय क्रमांक श्री. भिमराव उराडे व श्री. अनिल चव्हाण यांनी पटकावला तर बॅडमिंटन सिंगल पुरूष स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. अनिल चव्हाण व व्दितीय क्रमांक श्री. भिमराव उराडे यांनी पटकाविला. तर बॅडमिंटन महिला गटात डबल मध्ये कु. रूतुजा मडावी व कु. गंगा राठोड यांनी व्दितीय क्रमांक तसेच सिंगल मध्ये कु. रूतुजा मडावी यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. संगीत खुर्ची मध्ये महिला गटात प्रथम कु. मनिषा गावळे व व्दितीय कु. गंगा राठोड व पुरूष गटात श्री. प्रमोद बोरकर प्रथम व डॉ. हेमंत बारसागडे यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. तसेच दौडस्पर्धेत पुरूष गटात श्री. योगेश सोपनकर यांनी प्रथम व भिमराव उराडे यांनी व्दितीय तर महिला गटात कु. गंगा राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. खोखो स्पर्धेत कु. शालु शिवनकर यांना बेस्ट प्लेअर म्हणून गौरविण्यात आला.
कला प्रकारातील एकल गीत गायण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रशांत पुनवटकर, समुह गीत गायण स्पर्धेत कु. बबीता दुपारे व संचाने व्दितीय तर समुह नृत्यामध्ये कु. अश्विनी मरस्कोल्हे व संचाने व्दितीय क्रमांक पटकाविला. तसेच महीलेच्या वेशभुषेत अतिशय सुंदर लावणी नृत्य केल्याबद्दल श्री. संतोष नैताम यांना प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात आला.




