गडचिरोली:
गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा. गडचिरोली – NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार छत्तीसगड यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी तसेच गडचिरोली जिल्हयात रेती , मुरूम माफीया , दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृतांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये .महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री छत्तीसगड , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मोर्चाचे संयोजक पत्रकार मुनीश्वर बोरकर, गडचिरोली प्रेस क्लबचे सुरेश पद्मशाली, ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, गामाचे संयोजक उदय धकाते, व्हाइस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय तिपाले, जयंत निमगडे, मुकुंद जोशी, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे जगदिश कन्नाके, मारोती भैसारे विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कहूरके, कालीदास बुरांडे, नासिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा, मंगेश भांडेकर, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिश ढेंभुर्णे गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे या सह जिल्हयातील शंभराहून अधिक पत्रकार उपस्थित होते.




