राष्ट्रवादी काँग्रेस महिला व युवती पदाधिकाऱ्यांची निवडपक्ष मजबुत करा तनुश्रीताई आत्राम यांचे आवाहन

0
3

अहेरी:-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक शुक्रवारी राजवाड्यात पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम होत्या तर मंचावर किष्किंद्रराव बाबा आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम, नारायणराव बाबा आत्राम, पक्षाचे ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका ताई गडपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय स्थानावरून तनुश्रीताई आत्राम यांनी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच एकजुटीने सर्वांनी कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) एकहाती सत्ता हस्तगत करावे असे आवाहन करून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या विधायक कार्यावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन यावेळी तनुश्रीताई आत्राम यांनी केले.आढावा बैठकीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्ष पदी प्रणाली दुर्गे यांची निवड करून राष्ट्रवादी युवती नागेपल्ली शहराध्यक्ष पदी अश्विनी शेडके आणि आलापल्ली शहराध्यक्ष वैष्णवी येरबतनवार यांची नियुक्ती करून तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अहेरी तालुकाध्यक्ष पदी भाग्यश्री बेझलवार यांची तर राष्ट्रवादी महिला अहेरी शहराध्यक्ष पदी श्रीशा कुडकावार, आलापल्ली शहराध्यक्ष पदी सोनाली पांढरे यांची निवड करून यावेळी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)पदाधिकारी, कार्यकर्ते , महिला व युवती बहुसंख्येने उपस्थित होते.