कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच केला पित्याचा खून; आरमोरी तालुक्यातील पालोरा मार्गावरील थरार.

0
3
Oplus_16908288

आरमोरी (गडचिरोली):
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आपल्या ६५ वर्षीय वडिलांची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पालोरा मार्गावरील रेल्वे पुलाजवळ घडली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी मुलाला अटक केली आहे.

### **नेमकी घटना काय?**
मयत देवाजी धकाते यांचा पालोरा गावाजवळ विटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांना पाच मुली आणि योगेश नावाचा एकुलता एक मुलगा आहे. पाचही मुलींचे लग्न झाले असून, वर्षभरापूर्वीच देवाजींनी योगेशचा विवाह लावून दिला होता. योगेश आपल्या पत्नीसह आई-वडिलांकडेच राहायचा. पिता-पुत्र दोघेही दररोज विटाभट्टीवर कामाला जात असत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाजी धकाते हे योगेशच्या पत्नीला वारंवार रागावत असत. पत्नी गर्भवती असतानाही तिला कामे करण्यास सांगत, ही बाब योगेशला खटकत होती. याच कारणावरून पिता-पुत्रात सतत खटके उडत होते. याच रागातून योगेशने वडिलांचा काटा काढण्याचा थरारक कट रचला.
### **फोनवर बोलत असतानाच केला वार**
रविवारी सायंकाळी वीटभट्टीवरून वडील घरी निघण्यापूर्वीच योगेश तिथून निघाला आणि पालोरा गावाजवळील रेल्वे पुलाजवळ दबा धरून बसला. रात्री साडेसातच्या सुमारास देवाजी धकाते सायकलने घरी परतत होते. यावेळी ते आपल्या मुलीशी फोनवर बोलत होते. संधी साधून योगेशने वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने मागून सपासप वार केले. वडिलांच्या किंकाळ्या फोनवर मुलीने ऐकल्या आणि अचानक संवाद बंद झाला. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेने मुलीने तत्काळ शेजाऱ्यांना माहिती दिली.
### **बचावासाठी रचले बनावट नाट्य**
वडिलांची हत्या केल्यानंतर योगेशने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुऊन स्वच्छ केली आणि जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात घर गाठले. त्यानंतर तो स्वतः आई आणि चुलत भावांसोबत वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडला. अखेर रेल्वे बोगद्याजवळ देवाजींचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

<span;>> **वाघाची दहशत की हत्या?**

<span;>> सुरुवातीला हा प्रकार वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे वनविभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरमोरी पोलिसांना घातपाताचा संशय आला.

  1. >
    ### **पोलिसांची तत्परता आणि तपास**
    आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक **श्री. कैलास गवते** यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवले. योगेशची संशयास्पद हालचाल आणि त्याच्या विसंगत बोलण्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
    सध्या आरोपी योगेश धकाते पोलिसांच्या कोठडीत असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लामतुरे, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे व आरमोरी पोलीस पथक करीत आहे. या घटनेमुळे ताडुरवार नगर आणि संपूर्ण आरमोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.