सुरजागड इस्पात व मिआम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वडलापेठ येथे” एक पेड एक आंगण'” अभियानास सुरूवात.

0
78

अहेरी:
अहेरी तालुक्यातील खमनचेरु ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडलापेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरजागड इस्पात व मिआम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड एक आंगण अभियानास सुरुवात करण्यात आली.
हरियालीका संकल्प प्रकृती और प्रगती के साथ अशी भूमिका प्रत्येक नागरिकांनी स्वीकारली पाहीजे व पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पना करून आपल्या पुढील पिढीला सुरक्षीत, स्वच्छ व प्रदुषणरहीत पर्यावरण ठेवण्यासाठी भुतलावरील प्रत्येकानी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वडलापेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालीका श्रीमती नितू जोशी यांनी केले .

सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षापासून मानवाला कोणते फायदे मिळतात या बद्दल वेशभूषा साकारून जनजागृती सुद्धा केली
तसेच सुरजागड इस्पात व मिआम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आंबा,जाम,चिक्कु व ईतर फळांचे २०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यात जिल्हा परिषद शाळा वडलापेठ,चिंतलपेठ, जामगाव,इतलचेरु,आपापल्ली, दिनाचेरपल्ली तसेच वडलापेठ येथील नागरिकांना सुद्धा वृक्षाचे वाटप करून नितू जोशी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
यावेळी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महागाव (खुर्द) ग्रामपंचायत चे सरपंचा सौ रेणुका आत्राम,खमनचेरु ग्रामपंचायत चे सरपंच सायलू मडावी, जयश्री नैताम,लालशाही नैताम, मधूकर आत्राम,शालीकराव डब्बा,सत्यना पेरकी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय सुनके, विस्तार अधिकारी सुषमा चौधरी,आदर्श पुरस्कार शिक्षक खुर्शीद शेख, जेष्ठ नागरिक सखाराम सुके,शेवंता सुनके, संतोष आत्राम ,रोहित तरेवार अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन महेश अलोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर जगमवार यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी रोहीत तर्रेवार तसेच सुरजागड इस्पात व मिआम चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तथा वडलापेठ गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले.