वडलापेठ येथे मियाम च्या “ग्रीन हार्ट” पर्यावरण पूरक शिक्षण बाल शिबिराला सुरूवात

0
203

अहेरी
जि. प. शाळा वडलापेठ येथे सुरू झालेल्या पाचदिवसीय ग्रीन हार्ट बाल शिबीर विद्यार्थ्यांच्या बाल हृदयात पर्यावरणा विषयीचे मूल्य हसत खेळत विविध कृतीतून रुजावे ह्या साठी असून ह्या शिबिरात विद्यार्थ्यांना पर्यावरणातील पशु पक्षी, पाणी, माती, हवा,झाडे, सूक्ष्म जीव जंतू, ह्यांचे संरक्षण, संस्कृती व कलेतून पर्यावरण दृष्टी तसेच प्रकृती आणि प्रगती यांच्यातील समन्वय व आपली भूमिका ह्या विषयीच्या आनंददायी उपक्रमातून तसेच निसर्ग निरीक्षण भेटीतून पर्यावरण पूरक शिक्षण मिळणार आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी
मियाम चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापक श्रीमती नीतू जोशी
उद्घाटक श्री शैलू मडावी सरपंच ग्रा. पं. खमचेरू
अध्यक्ष पोलीस पाटील दुर्गे
प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक श्री खुर्शीद शेख राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तसेच श्री रोहित तर्रेवार
श्री प्रतीक येंनमवार श्री संतोष आत्राम
श्रीमती शेवंता सुंके ग्रा. पं. खमचेरू
पंकज पोटे सर , उपस्थित होते, सदर शिबिराचा लाभ
वडलापेठ व परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना होणार आहे . सदर शिबिरातून शिकलेल्या कलाकृती व संस्कारमय मूल्याचे प्रदर्शन व तसेच गावात वृक्षारोपण 5 जून पर्यावरण दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची संकल्पना श्रीमती नीतू जोशी ह्यांची असून ह्या शिबिरात पाच दिवस होणाऱ्या . विविध पर्यावरण पूरक बाल उपक्रम व आनंदमय कृतीचे नियोजन व मार्गदर्शन खुर्शीद शेख यांनी केले आहे . सदर शिबिरातून विद्यार्थ्यांना पौष्टीक भोजन आरोग्य व संस्कार विषयी सवयी लावण्यात येणार आहे.
सदर शिबिराचे आयोजन व बाल सुविधा रोहीत तर्रेवार मियाम जिल्हा प्रमुख हे बघत असून, महेश अलोने , गजानन जंगमवार , पंकज पोटे ह्यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ह्या शिबिरातून मिळणार आहे. आज ह्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात पालक, गावकरी, व पर्यावरण प्रेमींनी उपस्थिती दर्शविली सदर कार्यक्रमाचे संचालन महेश अलोने तर आभार गजानन जंगमवार यांनी मानले.