अहेरी तालुक्यातील, अतिवृष्टी व वादळामुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी :भाग्यश्री ताई आत्राम-हलगेकर यांची मागणी.

0
51

अहेरी:
भाग्यश्री ताई आत्राम( हलगेकर) यांनी अहेरी तालुक्यातील संड्रा गावास नुकतीच भेट दिली.
या भेटीत पाऊस, जोरदार वारा व अतिवृष्टीमुळे गावात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानाची पाहणी करण्यात आली. नागरिकांचे घरांचे, शेतीचे तसेच पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे चेरपल्ली या गावातही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.

गावातील सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी त्यांनी केली आहे.
गावातील खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा. पुनर्वसन व मदत कार्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.

संड्रा गावातील नागरिकांनी आपली व्यथा भाग्यश्री ताईंना सांगितली असून त्यांनी त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आहेत.
आणि लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.