एकलव्य मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमानुष मारहान करणाऱ्यांवर कारवाई करा :- सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम

0
3

अहेरी:
अहेरी येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या वस्तीगृहात अधीक्षकाने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. वस्तीगृहाचे अधीक्षक शेवाळे हे विद्यार्थ्यांना अमाणूस मारहाण करतात, मानसिक छळ करतात व वारंवार धमकी देतात असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 27 मार्च रोजी सदर घटनेची माहिती होताच तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी तात्काळ सदर शाळेला भेट दिली. व विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज साधत जेवणाची व्यवस्था, निवास व्यवस्था, ची पाहणी केली.शाळेतील मारहाण प्रकरणात दोषी असणारे अधीक्षक, मुख्याध्यापक, त्यांच्यावर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी अहेरी कुशल जैन यांना तनुश्रीताई आत्राम यांनी दिले आहे. निवेदन देताना सारिका गडपल्लीवार अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी {अजित पवार गट) प्रामुख्याने उपस्थित होते.