गडचिरोली:
गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिरांगी आणि फुलणार भागात नक्षल छावणी असल्याची माहिती पडताच अतिरिक्त पोलिस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबविण्यात आली.
सी-60जवान,क्यू आर टी दल व सी आर पीएफ यांनी हे संयुक्त मोहीम राबवली.
शोध मोहीमे दरम्यान सुरक्षा दलांचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास चकमक उडाली यामध्ये एक जवान जखमी झाला असून त्याला हेलिकॉप्टरने गडचिरोली/नागपूरला वैद्यकीय उपचारासाठी हलवले जात आहे.
घटनास्थळी नक्षल छावणी उध्वस्त करून साहीत्य जप्त करण्यात आले असून पुढील शोधमोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.




