अहेरीतील सामाजीक कार्यक्रमातील प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी वक्ता व आयोजकांवर गुन्हा दाखल.

0
1242

अहेरी:

अहेरी येथिल बोधीसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळामार्फत तिन दिवसीय सामाजिक प्रबोधन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. काल पहिल्याच दिवशी विलास खरात या वक्त्याने प्रक्षोभक वक्तव्य करीत हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्त्तव्य केले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, ब्राम्हण समाज व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे.
त्यामुळे संतप्त नागरीकांनी काल रात्रोच पोलिस स्टेशन गाठले. रात्री १२.०० वा. पर्यंत शेकडो हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते.कालच आयोजक व वक्त्याला पोलिस स्टेशनला आणण्यात येईल अशी अपेक्षा सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची होती. पोलिस विभागातर्फे तशी काहीच हालचाल न झाल्याचे बघुन सकाळी पुन्हा कार्यकर्ते चौकात जमा झाले आणि तेथुन पोलिस स्टेशन गाठले.तेथे पुन्हा कारवाईस होणारा विलंब बघुन तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेकडो कार्यकर्ते नारेबाजी करत पुन्हा राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात गोळा झाले.संबंधीतांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकत्यांनी केली आहे.
दरम्यान प्रक्षोभक वक्तव करणाऱ्या डॉ.विलास खरात व आयोजक बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक मंडळ यांच्यावर अहेरी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223,299,3(5) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
झालेल्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण असुन पोलीस प्रशासन हे प्रकरण कशाप्रकारे हाताळते याकडे लक्ष लागून आहे.