सिरोंचा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी केला नाविस मध्ये पक्ष प्रवेश

0
150

अहेरी:

सिरोंच्या तालुक्यातील रेगुंठा येथील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पाडत 120 युवा कार्यकर्ते यांनी पुरुषोत्तम कडार्लावार तथा आकाश बचालकुरा यांच्या पुढाकाराने माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली अहेरी येथील रुक्मिणी महाल येथे काल पक्षप्रवेश केला. त्यावेळी राजे साहेबांनी त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.!
“राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”अशी घोषणा बाजी यावेळी करण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समिती तर्फे आपला नामांकन अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नुकतेच दाखल केले होते. त्यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य जनता सहभागी होती.राजे लाखोंच्या मताने निवडणूक जिंकणार आणि अहेरी विधानसभा क्षेत्र विकासाच्या प्रगतीपथावर असणार, असे आज जनतेने ठरविल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे..