अहेरी येथील शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर चर्चा.

0
2

अहेरी :

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात अहेरी तालुक्यातील समूह साधन केंद्र अहेरी अंतर्गत आयोजित मॉडेल स्कूल येथे संपन्न झालेल्या नवीन शैक्षणिक सत्रातील पहिल्या शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा यावर भर देण्यात आला.शिक्षण परिषदेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष जोशी, उमेश चिलवेरवार, जितेंद्र राहूड, सुधाकर घोसरे, प्रमोद रोहनकर, ताराचंद भुरसे उपस्थित होते. उदघाटनाच्या प्रास्ताविकेतून केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास कोंडागोर्ला यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात शिक्षण परिषदेचे महत्व विषद केले. परिषदेला विशेष अतिथी म्हणून लाभलेले अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी निलेश ठाकरे यांनी जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता सुधारण्याबाबत व प्रत्येक शिक्षकांनी किमान एक विद्यार्थी नवोदय, शिष्यवृत्ती सारख्या परीक्षेत निवड करण्याचे ध्येय बाळगून कार्य करण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले.यावेळी परिषदेत शाळापूर्व तयारी, सेतू अभ्यासक्रम, निपुण महाराष्ट्र, विद्यांजली पोर्टल, डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी, पारख सर्वेक्षण, पीजीआय, नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा अशा विविध विषयांवर केंद्रातील शिक्षक गीतांजली आंबेकर, पदमा गोडसेलवार, सविता श्रीरामवार, सुधाकर घोसरे, सुनील मामीडवार, प्रदीप रामगिरवार व योगिता नैताम यांनी सुलभन केले. परिषदेला केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदमा गोडसेलवार तर आभार श्रुतिका योगोलपवार यांनी मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता मॉडेल स्कूल अहेरीचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी परिश्रम घेतले.