आल्लापल्ली येथील ‘ग्लोबल मीडिया केरला मॉडेल स्कूल’चा दहावीचा निकाल उत्कृष्ट; शरयू बिरेल्लीवार प्रथम

0
4

अहेरी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या (S.S.C.) परीक्षेत आल्लापल्ली येथील ‘ग्लोबल मीडिया केरला मॉडेल ई/एम स्कूल’ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेचा निकाल अत्यंत उत्साहवर्धक लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी:

शाळेतून शरयू बिरेल्लीवार हिने ९५.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल दानिश शेख याने ९१.००% गुणांसह द्वितीय, तर रागिणी कुनघाडकर हिने ८९.८०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.इतर यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

  • दिपिका खोब्रागडे: ८८.४०%

  • सोहम पुण्यमूर्तीवार: ८७.२०%

  • दिव्यानी महातपूरे: ८५.६०%

  • मनाली मदेशी: ८५.२०%

  • अक्षता तिरणकर: ८१.६०%

  • आर्यन गणवीर: ८०.८०%

  • श्रावणी कुड्यामी: ७८.६०%

  • ऐमान शेख: ७८.००%

  • ऋषित रागम: ७७.००%

  • कृष्णा येलपुला: ७६.४०%विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था चालक माजी आ.दिपकदादा आत्राम शाळेचे प्राचार्य सरिता नीलम शिक्षक वृंद आणि पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.