आलापल्लीत राम जन्मोत्सवाचा उत्साह; भव्य मिरवणुकीसाठी जय्यत तयारी, नवी कार्यकारिणी जाहीर

0
8

आलापल्ली (प्रतिनिधी):

गडचिरोली जिल्ह्यात आपल्या आकर्षक आणि शिस्तबद्ध श्री राम नवमी मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या आलापल्लीमध्ये यावर्षीच्या उत्सवाचे बिगुल वाजले आहे. शनिवार, ७ मार्च रोजी श्री राम मंदिर येथे श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित विशेष नियोजन बैठकीत उत्सवाच्या रूपरेषेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आगामी वर्षासाठी समितीची नूतन कार्यकारिणी देखील सर्वानुमते निवडण्यात आली.नियोजनावर विशेष भरआलापल्लीची रामनवमी ही संपूर्ण जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र असते. यावर्षी देखील मिरवणुकीत भव्य चित्ररथ (झांकी), फुलांनी सजवलेला रथ, पारंपरिक नृत्य पथके, सुश्राव्य संगीत आणि नेत्रदीपक रोषणाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संपूर्ण सोहळा अतिशय शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विविध उपसमित्यांची स्थापना करून कामाचे वाटप करण्यात आले.

नूतन कार्यकारिणी २०२६

नव्या जोमाने उत्सवाची जबाबदारी सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले:

  • अध्यक्ष: श्रीकांत जल्लेवार

  • उपाध्यक्ष: कुणाल वर्धलवार, प्रज्योत उईके

  • सचिव: अंशुल जल्लेवार

  • सहसचिव: करण कुशवा

  • कोषाध्यक्ष: शिवम नामनवार

  • सहकोषाध्यक्ष: आशू असरलावार

  • सदस्य: गौरव खंडरे, अनिश सानप, प्रतीक नामनवार, क्रिश येनगंटीवार, चैतन्य काशेटीवार.नवनियुक्त कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मान्यवरांची उपस्थितीया बैठकीला श्री राम जन्मोत्सव समितीचे प्रमुख श्री अमित येनप्रेड्डीवार, संतोष अग्रवाल, साई तुलसीगारी यांच्यासह सागर डेकाटे, गणेश मानेपल्ली, रोहित मुक्कावार, राज बंदूकवार, श्रीनिवास गचर्लावार, कौस्तुभ गादेवार, गणेश मोहुर्ले व मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.