आलापल्लीचा तरुण मेश्राम ने आतंरराष्ट्रीय कराटेस्पर्धेत प्राप्त केले सुवर्ण पदक .

0
7

आलापल्लीचा तरुण मेश्राम ने आतंरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्राप्त केले सुवर्ण पदक ….

अहेरी:

नुकत्याच 8 फरवरी 2026 ला हैद्राबाद येथील सारुरनगर ईडोंर स्टेडीयम स्पोर्ट्स आँथोरीटी आँफ तेलंगाना येथे झालेल्या 5 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ग्रीन बेल्ट 60 कि.ग्रॅ.वजन गटात रवि सर्स कराटे मार्शल आर्ट शाखा आलापल्लीचा लिटील मास्टर तरुण रमेश मेश्राम यांनी त्यांचे महागुरु प्रशिक्षक मास्टर सेन्साई रवि भांदककार व सेन्साई रमेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात प्रतीस्पर्धी नाॅकआऊट टु टाय करुन सुवर्ण पदक प्राप्त केले हि अभिमानाची बाब आहे
5 व्या कराटे आतंरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजक सेन्साई श्री रामुलुगारु जी हैद्राबाद यांच्या देखरेखीत पार पडली यावेळेस साऊत चे सुपर स्टार तथा चेअरमन (एन.डी.एफ.एम.ए.ए ) श्री सुमन तलवार गारु तथा साऊथ सुप्रसिध्द सिने हिरो श्री भानु चंदरगारु यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत 1500 च्या अधिक स्पर्धकाच्या ऊपस्थीतीत पार पडली
या आतंरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणुन बहुमान प्राप्त केलेले मान.मास्टर सेन्साई रवि भांदककार आतंरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जागतिक मास्टर्स कराटे विजेता याचां मान.श्री.भानू चंदरगारु साऊथ सिने हिरो.तथा मान.श्री रामुलुजी ( अध्यक्ष तथा आयोजक ) याच्यां हस्ते शाल श्रीफळ व शिल्ड देऊन सत्कार केला हा मिळालेला बहुमान जिल्ह्याकरीता आदर्श राहील.
तरुण मेश्राम हा होणहार आदिवासी खेळाडु असुन त्यांचे स्वप्न त्याच्यां महागुरु सारखे समोर दैदिप्यमान यश संपादन करणे आहे त्यांनी यापुर्वी अनेक स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळविले आहे तरुण लहान वयापासुनच नियमीत सराव करीत आहे त्याला महागुरु म्हणुन त्याचे आदर्श रवि सर आहेच पण यात त्यांचे वडील सेन्साई रमेश मेश्राम सर (माझी बि.एस.एफ जवान )यांचाही फार मोठा समावेश आहे तरुण चे सर्वस्तरावरुन शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीकरीता शुभकामना प्रदान करण्यात आल्या.