अहेरी:20डिसेंबर
गोटूल वृत्तसेवा
अहेरी भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनास जर्मनी येथील नागरिक रेहानंद ब्रेमर व मिलेना ब्रेमर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे प्राचार्य शाहीद शेख, ग्रीनलँड शाळेचे प्राचार्य महेश गागापुरप यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले.या प्रसंगी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध विज्ञान विषयांवरील मॉडेल्स, प्रयोग तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना उत्सुकतेने पाहिल्या. विद्यार्थ्यांची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सादरीकरण कौशल्य यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता विकसित होते, असे मत मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस नवी प्रेरणा मिळाली आहे.




