अहेरी पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत 53लाख 65हजाराचा मुद्देमाल केला नष्ट.

0
15

अहेरी:

     अहेरी पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांचे एकत्रित कारवाई मध्ये एकुण १७२ गुन्हयात जप्त केलेला 53लाख, 65हजार 393रुपयाचा  मुद्देमाल 

भुजंगरापेठा येथील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला.
यामध्ये देशी दारु ९० एम.एल. मापाच्या ३३,४५४ प्लॉस्टीक निपा, विदेशी दारु ९० एम.एल. मापाच्या १६५ निपा
,विदेशी दारु १८० एम.एल. मापाच्या १६५ काचेची बाटल्या,
,विदेशी दारु ३७५ एम.एल. मापाच्या ४५ बाटल्या, विदेशी दारु ७५० एम.एल. मापाच्या २७७ बाटल्या
, विदेशी दारु १००० एम.एल. मापाच्या ६१ बाटल्या,विदेशी दारु ०२ लिटर क्षमतेच्या १९३ बाटल्या,बिअर ५०० एम.एल. मापाच्या २०८२ टिनाचे कॅन
,बिअर ६५० एम.एल. मापाच्या ९९२ बाटल्या
असा एकूण 53 लाख 65 हजार 393 रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक, अहेरी श्री. सत्यसाई कार्तिक, उप विभागीय पोलीस अधिकारी,अहेरी श्री अजय कोकाटे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण हर्षल एकरे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश वळवी (अहेरी पोलीस ठाणे) श्री.ग.द. कुचेकर निरीक्षक(राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, गडचिरोली) श्री.शुभम चौधरी, उप निरीक्षक, (राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक गडचिरोली) पोहवा/ १८५० पोस्टे. हेडमोहर पेंदाम व पोलीस स्टाफ यांनी दि. 18/08/2025 रोजी भुजंगरापेठा, अहेरी येथील, मोकळ्या जागेत पार पाडली.