अहेरी :
प्रकल्प उभा राहण्याआधी सामान्य जनतेचे मत घेणे आवश्यक असते प्रदूषण रोजगार व इतर समस्या मांडण्यासाठी प्रशासनाकडून जनसूनावणीचे आयोजन करण्यात येते . मात्र अहेरी विधानसभा क्षेत्र उभ्या राहणाऱ्या खान प्रकल्पासाठी जनसुनावणी जनतेचा सहभाग कमी होत आहे.कारण स्थानिक स्तरावर ही जनसुनावणी होत नसल्याने जनतेचा सहभाग कमी होत आहे त्यामुळे ही जनसुनावणी स्थानिक स्तरावर घेण्यात यावी अशी मागणी आज माजी पालकमंत्री यांनी अहेरी येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात येत्या काळात अनेक खान प्रकल्प येणार आहे. त्यामूळे प्रकल्पासंदर्भात कृषी प्रदूषण व इतर अनेक समस्या उभ्या राहणार आहे त्यामुळे याबाबतीत सर्वसामान्य जनतेचे मत घेण्यासाठी जनसुनावणी घेण्यात येत असते मात्र ही जन सुनावणी स्थानिक स्तरावर न घेता गडचिरोली येथे घेतल्या जात असल्याने सर्वसामान्य जनतेला आपला सहभाग आपले मत मांडता येत नाही.
सामान्य जनतेचे समस्या शासन प्रशासनापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे मात्र येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे साफ याकडे दुर्लक्ष होत आहे.
असे सुरू राहील तर आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही सामान्य जनतेचे हक्काची पायमल्ली होत आहे लोकशाहीत लोकांचे म्हणणे ऐकणे आवश्यक असते मात्र शासन प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचे दिसत आहे.
प्रकल्पात रोजगार देताना स्थानिक व बाहेरच्या किती लोकांना रोजगार दिला हे कोणी विचारत नाही त्यांना किती पगार आहे हे सुद्धा विचारत नाही त्यामुळे स्थानिक युवकां वर अन्याय होत असल्याचे चित्र या प्रकल्पात दिसत आहे.
पर्यावरण विभागातर्फे जनसुनावणी घेताना स्थानिक स्तरावर घ्यावी असं कायदा कानून आहे मात्र कायद्याची पायमल्ली करून ही जन सुनावणी गडचिरोली ती घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रकल्प त्या ठिकाणी जन सुनावणी घेतली जावी. प्रकल्पासाठी चांगली को सिस्टम सुरू होऊन रोजगार शिक्षक या क्षेत्राचा विकास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले त्यासोबत वीज पाणी शिक्षण रोजगार इत्यादी सुविधा काम झाले पाहिजे
स्थानिक युवकांना रोजगार देऊन विकासाबाबत चांगले धोरण राबवले आणि चांगले काम केले तर प्रकल्पाला नक्कीच माझी साथ राहील अशी ग्वाही त्यांनी या पत्रपरिषद दिली.




