अहेरी:
नागविदर्भ आंदोलन समितीचे अधिकृत उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची मूलचेरा तालुक्यातील अनेक गावात कॉर्नर बैठक घेतली.
मुलचेरा तालुक्यातील अनेक गावात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉर्नर बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला
यावेळी या भागात केलेल्या विकासकामांची पावती म्हणून मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत अशी आग्रहाची विनंती केली. अनेक वर्षापासून रखडलेली कित्येक कामे मार्गी लावली. जे कामे २५ वर्षात झाले नाही ते मी अवघ्या ५ वर्षात करून दाखवली,मी मंत्री असतांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या भागातील नागरिकांना मिळवून दिला. तरी जनतेने मला भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केले.यावेळी प्रत्येक गावात मोठ्या उत्साहाने स्वागत करत आपला सहभाग नोंदविला.प्रसंगी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




