अहेरी :-
अहेरी नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या 17 प्रभागातील व मुख्य मार्गांवरील मोकाट जनावर फिरत असल्या मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मोकाट जनावराला पकडून जमा करण्याची मोहीम सुरू करन्यात आली आहे.
मोकाट जनावरांना पकडून येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात येत आहे.
अटी व शर्ती वर आणि दंड आकारून काही जनावरांच्या मालकांनी सोडून नेले आहे.
जवळ पास 40-45 जनावरे जप्त झालेले होते.
नगर पंचायत त्यांना चारा व पाणी देऊन रक्षण करीत आहे.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून गो शाळेला नेण्यात येणार आहे. असे नगर पंचायत प्रशासनाने माहिती दिली आहे.




