आता अहेरीत मिळणार पारीचारिकेचे प्रशिक्षण मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते

0
34

प्रथमतः अहेरी येथे नर्सिंग कॉलेज

अहेरी:-

आता विद्यार्थी यांना पारिचारिकेचे प्रशिक्षण मिळणार आहे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले .स्नेहादेवी धर्मराव बाबा आत्राम बहुद्देशीय संस्था अहेरी द्वारा संचालीत स्नेहधर्म कॉलेज ऑफ नर्सिंग (G.N.M.)चे शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी शुक्रवारी केले.
या प्रसंगी अध्यक्षीय स्थानी सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, माजी प्राचार्य रतन दुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दीवार, वासुदेव पेद्दीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी येथे नर्सिंग कॉलेज अत्यावश्यक होते असे म्हणत यातून नवी पिढी घडणार याचे अत्यानंद असून या कॉलेजचे लाभ प्रशिक्षणार्थिनी घेण्याचे आवाहन केले.
तत्पूर्वी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, फित कापून विधिवत व रितसरपणे नर्सिंग (G.N.M.) कॉलेजचे शुभारंभ केले.