उद्या अहेरी येथे कव्वालीचा दुय्यम मुकाबला मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उदघाटन उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

0
10

अहेरी- धर्मराव बाबा आत्राम फॅन्स क्लब अहेरीच्या वतीने दसरा निमित्य शनिवार 12 ऑक्टोबर रोजी येथील जुने तहसील कार्यालय जवळील पटवर्धन मैदानात सायंकाळी सात वाजता पासून कव्वालीचा जंगी व शानदार दुय्यम मुकाबला होणार आहे.
कव्वालीत प्रसिद्ध गायक (कव्वाल)जुनेद सुलतानी आणि सूप्रसिद्ध गायिका गुलतान साबरी (कव्वाला) हे येणार असून कव्वालीचा दुय्यम शानदार मुकाबला होणार आहे.


कव्वालीचे उदघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम हे करणार असून प्रमुख उपस्थिती रवींद्र बाबा आत्राम, तनुश्रीताई आत्राम , हर्षवर्धनराव बाबा आत्राम, रामेश्वरराव बाबा आत्राम, रवींद्र वासेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष, पुष्पाताई अलोणे, महिला जिल्हाअध्यक्षा , रियाज शेख, कार्यकारी जिल्हाध्यक्ष, लक्ष्मण येरावार अहेरी विधानसभा अध्यक्ष, नागेश मडावी, सारिका गडपल्लीवार महिला तालुकाध्यक्ष , शैलेश पटवर्धन न. पं.उपाध्यक्ष, विलास सिडाम, नगरसेवक , नौरास शेख नगर सेविका, सुरेंद्र अलोणे सामाजिक कार्यकर्ते, महेश बाक्केवार नगरसेवक, विलास गलबले नगर सेवक , ज्योती सडमेक नगर सेविका , डेव्हिड बोगी, रतन दुर्गे, कैलास कोरेत आदी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.