आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयासमोर सुरु असलेल्या वनमजुराचे स्थगित वेतन तात्काळ अदा करा अन्यथा तिव्र आंदोलन करणार :विजय खरवडे यांचा ईशारा.

0
1

अहेरी:

आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणाऱ्या लाकडाचे डेपो,तथा जंगल परिसरात आवश्यकते नुसार रोजंदारी वनमजुर म्हणून शासकीय दरा नुसार मजुर कामावर घेण्यात आले.तसेच वाहतूक विपणन डेपो मध्ये काही कंत्राटी पद्धतीने वनमजुर लावण्यात आले.त्यात अनेक मजुरानी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत वनविभागाची सेवा केलेली आहे.गट बांधणी व ओडवन मोजमाप या कामाचे वेतन गेले सहा महीन्या पासून मिळालेला नाही.सदर वेतन बलारशा वाहतूक विपणन तर्फे लाकुड डेपो आलापल्ली मध्ये होत असते.तसेच रोजंदारी हंगामी मजुर वर्ग मध्यवर्ती काष्ठ भांडार क्रं.-1 आलापल्ली येथे आहे.परंतु गेले पाच ते सहा महिन्याचा कालावधी लोटुनही त्यांना मजुरी वेतन न मिळाल्याने वनमजुर रवि गज्जलवार, भिमराव कोसरे, सागर काटेल, रितीक मडावी सुरज वानखेडे, तिरुपती एलकरी, श्री सत्यवाण आत्राम,राकेश आत्राम, बजरंग कुमराम व अन्य वनमजुरानी अनेकदा संबंधित वनाधिकारी यांची भेट घेतली व स्थकीत वेतन संदर्भात विनंती केली परंतु वरीष्ठ वनाधिकारी यांचे कडुन नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळाली.तेव्हा सगळी रोजंदारी वनमजुर एकत्र येऊन त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालया समोर आंदोलन सुरू केलेले आहे.जवळपास आंदोलनाला आठ दिवस लोटुन सुध्दा त्यांचे आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही.ही फार मोठी शोकांतिका असुन वनविभागाला अशोभनीय आहे. वनविभागात रोजंदारी वनमजुर म्हणून काम करणारे मजूर अत्यंत गरीब आहेत व त्यांचा कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह त्यांचे मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून आहे.तेव्हा त्यानी केलेल्या कामाचा व पाच ते सहा महिने मजुरी वेतन न मिळाल्याचे विचार करून त्या गरीब मजुरानी रास्त मागणी घेऊन सुरू केलेले आंदोलन तात्काळ मागे घेऊन त्यांना कशाचाही विलंब न करता एकुण मजुराचे स्थगीत मजुरी वेतन तात्काळ देण्यात यावे या करीता राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री यांना लिखीत निवेदन सादर करुन गडचिरोली येथील प्रादेशिक वनवृताचे वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व उपवनसंरक्षक आलापल्ली यांची प्रत्यक्ष भेट घेतली तेव्हा त्यांनी काही प्रमाणात वनमजुराचे स्थगीत वेतन अदा करणार असल्याची माहिती दिली.यावेळी पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी आंदोलन कर्त्यांना योग्य न्याय मिळवून देण्या करीता साखळी उपोषणास पाठींबा जाहीर केले.तेव्हा लवकर वनमजुरांना न्याय मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगितले.