आलापल्ली : इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, आलापल्ली येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. स्वरूप गावडे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कैलाश कोरेत, श्री. उमेश आत्राम व श्रीमती गंगुबाई देटे उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद मेश्राम, प्राध्यापक श्री. हर्षल धाबेकर व श्री. हणमंतू आदे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त, शिक्षणाचे महत्त्व आणि राष्ट्रसेवेची भावना याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सारिका ताकलवार, स्विमिता अडगोपुलवार, पल्लवी झाडें, पूजा ओडपल्लीवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.