अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आलापल्ली नगर कार्यकारणी जाहीर; नगर मंत्रीपदी अर्जुन मल्लेलवार तर नगर सह मंत्रीपदी प्रध्युमान जाधव यांची निवड!

0
2

आलापल्ली:

स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) आलापल्ली नगराची नवी कार्यकारिणी दिनांक ४ ऑगस्ट रोजी उत्साहात जाहीर करण्यात आली. विद्यार्थी हित आणि संघटनात्मक मजबुतीसाठी आगामी वर्षाकरिता ही नवीन धडक कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

या कार्यकारणी घोषणेच्या प्रसंगी अहेरी जिल्हा विद्यार्थी विस्तारक लोचनजी तलमले, जिल्हा छात्रा प्रमुख शीतल झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर निर्वाचन अधिकारी म्हणून रोहित मुक्कावार यांनी जबाबदारी पार पाडली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • नगर मंत्री: अर्जुन मल्लेलवार

  • नगर सह मंत्री: प्रध्युमान जाधव

  • सेवार्थ विद्यार्थी कार्य संयोजक: रोशन खोब्रागडे

  • विकासार्थ विद्यार्थी कार्य संयोजक: अभिनव शिडाम

  • कोष प्रमुख: हर्षल मडावी

  • सोशल मीडिया संयोजक: आर्यन नरोटे

  • कार्यालय मंत्री: पृथ्वी गावंडे

  • खेलो भारत संयोजक: शुभम चक्कीनारमवार

  • राष्ट्रीय कलामंच संयोजक: साक्षी सुनतकर

  • कार्यकारिणी सदस्य: वैभव दत्ता, गौरव चंदूपूछलवार, शीतल झाडे, लोचन तलमले

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात विद्यार्थी प्रश्नांवर आणि विविध सामाजिक उपक्रमांत ही कार्यकारिणी अग्रस्थानी राहून कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.