अहेरी (विशेष प्रतिनिधी):
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उबाठा) व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात निरनिराळे सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. याच धर्तीवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना फळे आणि बिस्कीट वाटून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबवण्यात आला.हा संपूर्ण रुग्णसेवा कार्यक्रम शिवसेना (उबाठा) अहेरी जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या प्रसंगी अहेरी जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम, अहेरी तालुका प्रमुख प्रफुल येरने, उपतालुका प्रमुख रुपेश बांदेला, मोनू सलामे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश मोहुर्ले, मनसे अहेरी तालुका अध्यक्ष प्रणित श्रीरामवार, मनसे अहेरी तालुका सचिव सुदामा हलदार, मनसे अहेरी शहराध्यक्ष अमोल रामटेके, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकूलकर, तसेच मिंटू भैया सय्यद, विकी गुप्ता, शिवसैनिक सोनू चीलंनकर यांच्यासह शिवसेना व मनसेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




