अहेरी (गडचिरोली):3 जानेवारी
द गोटूल वृत्तसेवा
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला अहेरी पोलिसांना मोठे यश आले आहे. आलापल्ली येथील तीन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ३ लाख ३३ हजार १८० रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली असून, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि अहेरीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या सुमारास आलापल्ली येथील वार्ड क्र. ५ मध्ये संशयित आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला.जप्त केलेला मुद्देमाल:पोलिसांनी एकूण १७ प्रकारच्या देशी-विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
विदेशी व्हिस्की: रॉयल स्टॅग, रॉयल ग्रीन, ओकस्मिथ गोल्ड, आयकोनिक व्हाईट, आणि ऑफिसर्स चॉइस (मोठ्या बाटल्यांसह).
रम व वोडका: ओल्ड मोंक, ब्लॅक बकार्डी रम आणि लिटल लिटल वोडका.
देशी दारू: रॉकेट संत्रा देशी दारूचे ६४६ नग.
इतर: प्रीमियम बिअर आणि विविध कंपन्यांच्या १८० मिली व २००० मिली मापाच्या बाटल्या.आरोपींची नावे:या प्रकरणी पोलिसांनी खालील तीन आरोपींविरुद्ध अहेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे:१. नरेश लक्ष्मण मिसाल (वय ३५ वर्षे)२. वनिता सचिन मिसाल (वय २६ वर्षे)३. सुशीला मधुकर ईरबत्तनवार (वय ६० वर्षे)(सर्व राहणार वार्ड क्र. ५, आलापल्ली, ता. अहेरी)गुन्हा दाखल व तपास:सदर आरोपींविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ००६/२०२६, कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक चैतन्य दत्तात्रय घावटे यांनी दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी करत आहेत.कारवाई करणारे पथक:ही यशस्वी कारवाई सपोनि मंगेश वळवी, पीएसआय चैतन्य घावटे, पोलीस हवालदार विडपी, प्रशांत कांबळे, राकेश करमे, पोलीस शिपाई दरौ, जनबंधू, महिला पोलीस हवालदार पेंदाम आणि राठोड यांच्या पथकाने केली आहे.




