भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष पदी विकास तोडसाम यांची वर्णी

0
218

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपा प्रदेश कमिटीने राज्यातील सर्वच तालुका अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू केली आहे. आज रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी अहेरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात नुतन तालुकाध्यक्ष पदाची निवड केली आहे या पदासाठी तिघांची नावे चर्चेत होते पण माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री श्रीमंत राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कट्टर समर्थक असलेल विकास रमेश तोडसाम यांची तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड झाली आहे.
ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी दामोधर अरिगेला यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पार पडली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी विकास तोडसाम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
विकास तोडसाम यांनी सर्व भाजप पदाधिकारी व विशेष राजे अंब्रीशराव महाराज यांचे श्री विठ्ठल रखुमाई यांच्या साक्षीने आभार मानले.

यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष यांचे अभिनंदन होत आहे.