गडचिरोली:.
एटापल्ली तालुक्यातील अतिसवेंदनशील नक्षलग्रस्त सुरजागड नेंडेर येथील नामे चिन्नी बैरा जोई वय, 80 वर्षे, नातेवाईकांच्या घरी निघालेली परंतु रस्ता भरकटलेली वृद्ध महिला अनवानी पायांनी मागील चार दिवसापासून आलापल्ली येथील मन्नेवार कॉलनीत फिरत होती त्या परिसरातील नागरिक जेवणाची व्यवस्था करून द्यायचे परंतु तिला फक्त माडिया भाषाच अवघत होती त्यामुळे सदर महिला कोणत्या गावातील आहे हे माहिती करून घेणे नागरिकांना कठीणच होते,सर्वीकडे मुसळदार पाऊस त्या प्रसंगात नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत यांना माहिती देताच त्यांनी माणुसकीचा धाडस दाखवून सदर महिलेच्या व्हाट्सफ ग्रुपद्वारे शोध घेतला असता नेंडर गावातील निघाली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रोमीत तोम्बर्लावार यांना संपर्क साधून वाहनाची व्यवस्था करून देण्यासाठी विनंती केली लगेच त्यांनी तत्परतेने मदतकार्यास वाहन पाठविले असता अखेर चिंन्नीबाईंना स्वगावी कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, यावेळी रायुकाचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, हितेश कुळसंगे,आशु चापले भगवान गावडे, पाटाडी हिचामी, अर्जुन आलाम,मंगेश पुंगाटी, रैजू हिचामी, संतोष उसेंडी, आदी उपस्थित होते, नक्षलग्रस्त भागातील या संवेदनशील प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेली माणुसकी आणि एकजुटीची ही घटना खरोखरच कौतुकास्पद आहे…..! कुटूंबायांनी समाधान व्यक्त करत आभार मानले….!




