अहेरी:
चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नाशिक या पुण्य नगरीत कलावंत विचार मंच व कमळ फिल्म प्रोडक्शन या संस्थेतर्फे निशा श्रीनिवास गोवर्धन यांना मॉडेलिंग क्षेत्रातील गुणवंत कलावंत चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अनेक गुणवंत कलावंत व मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत कलावंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजक दिग्दर्शक सुनील मोंढे , श्री सतीश खरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते व सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिल कुमार साळवे यांच्या शुभहस्ते निशा गोवर्धन यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यापूर्वी देखील त्यांना असेच अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले असून पुढील आयुष्यात या क्षेत्रात उंच भरारी घेण्याचा त्यांचा मानस दिसून आला.
विदर्भात दुर्गम भागात असलेल्या आलापल्ली या गडचिरोली जिल्ह्यातील गावापासून निशा गोवर्धन यांनी मॉडलिंग क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केलेली आहे




