खालसा महाविद्यालय भ्रष्टाचार प्रकरणाचा निकाल कधी येणार? १० वर्षे लोटूनही प्रकरण न्यायालयात प्रलंबित; तक्रारदार वसंत उटीकर यांची तीव्र नाराजी.

0
2

मुंबई (प्रतिनिधी):

मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध व प्रतिष्ठित गुरु नानक खालसा कॉलेज, माटुंगा येथे २०१४ साली कॉलेज प्रवेश प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण वसंत उटीकर यांनी उघडकीस आणले होते. या गंभीर प्रकरणात त्यावेळी मुख्याध्यापक व स्विय सहाय्यक हे भ्रष्टाचारात रंगेहात पकडले गेले होते. मुंबईतील महाविद्यालयीन इतिहासात एवढे मोठे हे पहिलेच प्रकरण होते, जे त्यावेळी गाजले होते.

  • एसीबीकडून सन्मान: या प्रकरणात त्याकाळातील मुंबईचे एसीबी प्रमुख प्रवीण दीक्षित तसेच एसीबी कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी वसंत उटीकर यांचा छोटेखाणी सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्रही दिले होते.

  • १० वर्षांपासून निकाल प्रलंबित: २०१४ सालापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, १० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटून गेला तरी न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही.

आरोपी अजूनही मोकाट

या प्रकरणातील संबंधित आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत, ज्याबद्दल वसंत उटीकर यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे.

तक्रारदारांसमोर प्रश्नचिन्ह: अशा संवेदनशील महाविद्यालयीन भ्रष्टाचार प्रकरणात जर वर्षानुवर्षे न्याय मिळत नसेल, तर आगामी काळात तक्रारदार पुढे कसे येतील, असा सवाल उपस्थित होतो. अशा प्रकारे केवळ शासनाचे प्रशस्तीपत्र मिळून कोणता उद्देश साध्य होणार आणि अशा प्रशस्तीपात्रांची समाजात खरीच पत आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाच्या अंतिम निकालाबाबत कोणी कायदेशीर जाणकार, तज्ज्ञ किंवा अभ्यासक मार्गदर्शन करतील का, या विवंचनेत आज वसंत उटीकर अत्यंत व्यथित झाले आहेत.