आलापल्ली येथे श्री शिव परिवाराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा; २१ एप्रिलपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0
4

अहेरी :

आल्लापल्ली येथील श्रीराम मंदिर, चंद्रपूर रोड परिसर आता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. समस्त हिंदू परिवार आलापल्ली व नागेपल्ली यांच्या वतीने आलापल्ली नगरीत नवनिर्मित श्री शिव परिवाराच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.या सोहळ्याचे उद्घाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री ना. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. नीतू जोशी उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा:

या उत्सवाचे नियोजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले असून, तीनही दिवस विविध विधी पार पडणार आहेत:

  • २१ एप्रिल २०२६ (मंगळवार): सकाळी ८:३० वाजता प्रायश्चित्त दशविधी स्नान, कलशयात्रा (जलपूजन), चौरंगपूजन आणि जलाधिवास कार्यक्रम होतील.

  • २२ एप्रिल २०२६ (बुधवार): सकाळी ९:०० वाजता वेदीपुजन, धान्याधिवास, हवनपुजन आणि नित्यपुजन होईल. तर सायंकाळी ६:०० वाजता फलाधिवास, पुष्पाधिवास, धूपाधिवास आणि शय्याधिवास यांसारखे विधी पार पडतील.

  • २३ एप्रिल २०२६ (गुरुवार): या मुख्य दिवशी सकाळी ६:०० वाजता वेदीपुजन व मूर्तीचे घृतस्नान होईल. त्यानंतर नगरभ्रमण, मंदिर भ्रमण, प्राणप्रतिष्ठापना आणि पूर्णाहुती दिली जाईल.सायंकाळी 6 वाजता गंगाआरती,सायंकाळी ७:०० वाजता महाआरती होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.

  • आयोजकांचे आवाहन:आलापल्ली आणि नागेपल्ली परिसरातील समस्त भाविक भक्तांनी या मंगलमयी सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ‘समस्त हिंदू परिवार आलापल्ली/नागेपल्ली’ व श्रीराम व हनुमान मंदिर कमिटी, आलापल्ली यांनी केले आहे.