मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम येथे राहणारा अनादी अमुल्य सरकार वय 40 वर्ष याला सन 2012 मध्ये बलात्काराच्या गुन्हयामध्ये मुलचेरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयाबाहेर आणुन बेडया लावत असतांना आरोपी अनादी सरकार हा पोलीसांना चकमा देवून फरार झाला होता.
सन 2012 पासुन पोलीसांच्या तावडीतुन फरार झालेला आरोपी अनादी सरकार शोध घेवुनही तो मिळून येत नव्हता, दि. 03/11/2024 रोजी अशी गोपनिय माहिती मिळाली की, सदर आरोपी हा देशबंधुग्राम येथील आपल्या राहते घरी आला आहे, या विश्वसनिय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोनि. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोउपनि संदिप साखरे, पोलीस हवालदारचरनदास कुकडकार, पोहवा विष्णू चव्हान, पोशि संतोष दहेलकर, पोशि बाळू केकान, पोशि सचिन मंथनवार मपोशि जयश्री आव्हाड, मपोशिशोभा गोदारी यांनी काल . देशबंधूग्राम येथील आरोपीच्या घरी सापळा रचुन अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालय चामोर्शी येथे हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोनि. श्री. महेश विधाते यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.



