राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा अहेरीचा श्री विजयादशमी उत्सव उद्या.

0
218

अहेरी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा अहेरीचा श्री विजयादशमी उत्सव उद्या दि.13 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी 6 वाजता अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.

या उत्सवाला प्रमुख वक्ता म्हणून प्रांत बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री.उल्हासजी वामनराव इटनकर तर प्रमुख अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिविंग चे योगा शिक्षक श्री प्रवीणजी येगोलपवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वर्षभरात ठिकठिकाणी संघशताब्दी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला स्वयंसेवक आणि नागरिक सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन मा.जिल्हा संघचालक श्री सुरेश गडमवार व अहेरी नगर कार्यवाह एडवोकेट श्री यशवंत मेश्राम यांनी केले आहे.