बिनागुंडा येथे धरती आबा बिरसा मुंडा व पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व धान्य वाटप संपन्न!

0
2

बिनागुंडा:

धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिनागुंडा येथे डॉ. किशोर नैताम फाउंडेशनच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात परिसरातील लहान मुलांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य व कला साहित्य भेट देण्यात आले, तसेच बिनगुंडा व फोदेगाव येथील कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.

या प्रेरणादायी कार्यक्रमास अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती श्री. रावजी नैताम (अध्यक्ष, डॉ. किशोर नैताम फाउंडेशन),डॉ. सुमती किशोर नैताम (सचिव, डॉ. किशोर नैताम फाउंडेशन व इतर सदस्य),श्री. कैलासभाऊ कोरेत (युवा नेते, आदिवासी विद्यार्थी एकता मार्च),श्री. शंकरभाऊ मेश्राम (माजी सरपंच आलापल्ली,श्री. रामा धुर्वा (पाटील, बिनगुंडा) व त्यांची कन्या कु. गीता धुर्वा,श्री. शागिर्द शेख (मुख्याध्यापक, विनोबा आश्रम शाळा)

कार्यक्रमादरम्यान बिनगुंडाचे ग्रामस्थ, फोदेगावचे नागरिक आणि मोठ्या संख्येने लहानगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच, गरजू कुटुंबांना धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल ग्रामस्थांनी फाऊंडेशनचे आभार मानले.