आलापल्लीत श्रीराम मंदिरात १७ नोव्हेंबरपासून भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ. ह.भ.प. सौ. सविताताई बेलोरकर यांच्या सुमधुर वाणीतून रसिकांना मिळणार भागवत कथेचे अमृतपान.

0
1

अहेरी:

आलापल्ली व नागेपल्ली परिसरातील भाविक भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येथील श्रीराम मंदिर परिसरात दिनांक १७ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान भव्य श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक महोत्सवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदिका तथा वक्त्या ह.भ.प. सौ. सविताताई बेलोरकर (यवतमाळ) यांच्या सुमधुर आणि रसाळ वाणीतून भागवत कथेचे विस्तृत विवेचन ऐकण्याचे भाग्य परिसरातील नागरिकांना लाभणार आहे.

कुटुंब आणि समाजाच्या योग्य जडणघडणीत तसेच राष्ट्रकार्यात आध्यात्मिक विचारांचे आणि मूल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. याच उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून या दिव्य ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत होणाऱ्या या कथेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या भागवत कथा सोहळ्यात परिसरातील सर्व धर्मप्रेमी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार आणि आपल्या आप्तोइष्टांसह उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने नम्रपणे करण्यात आले आहे.