नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा मारली बाजी: अभिजीत वंजारी विजयी; कराडे गुरुजी ठरले गेमचेंजर!
नागपूर, दि. २९: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत आपली जागा कायम राखली आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीत कराडे गुरुजी यांची भूमिका निर्णायक ठरल्याने ते या निवडणुकीचे ‘गेमचेंजर’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून हकालपट्टी झालेले नितेश कराळे गुरुजी (कराळे मास्तर) ‘गेमचेंजर’ ठरण्यामागे प्रामुख्याने भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यातील या पारंपरिक आणि अटीतटीच्या लढतीत कराळे गुरुजींनी अपक्ष उमेदवार म्हणून उतरत तब्बल २४,००० हून अधिक मते मिळवली. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांचे राजकीय गणित बिघडले.
दुसऱ्या पसंतीची मते ठरली (Second Preference Votes) निर्णायक:
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार (Preference voting) मतदान होते. पहिल्या पसंतीक्रमात कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असणारा कोटा पूर्ण करता आला नाही. अशा स्थितीत कराळे गुरुजींना मिळालेल्या २४ हजार मतपत्रिकांवर नोंदवलेला ‘दुसरा पसंतीक्रम’ कोणाच्या बाजूने आहे, यावर विजयाचे गणित अवलंबून होते.
कराळे गुरुजींच्या मतपत्रिकांमधील दुसऱ्या पसंतीची मते भाजप किंवा काँग्रेसपैकी ज्या उमेदवाराकडे जातील, तोच उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचणार असल्याने त्यांच्या पाठीमागे गेलेला हा मोठा जनसमुदाय निवडणुकीचा संपूर्ण निकाल बदलणारा ठरला.
नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता ८४ टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली. तब्बल ४१ तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
मतमोजणीची आकडेवारी: पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. पहिल्या पसंतीच्या १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. त्यानंतर द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली, परंतु त्यातही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा गाठता आला नाही.
अखेर, पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते मिळवणारे अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली.
या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि वॉर्डाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि ४१ तासांच्या मॅरेथॉन मतमोजणीनंतर अखेर काँग्रेसने या मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे.




