आलापल्ली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

0
1

अहेरी:

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी बुधवारी भव्य पक्षप्रवेश व कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम पार पडला. गडचिरोली लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक शासकीय विश्रामगृहात हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात निवृत्त केंद्रप्रमुख राजू आत्राम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यासोबतच आगामी काळातील पक्षबांधणी लक्षात घेता कार्यकारिणीतील नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेतआलापल्ली शहरप्रमुख राजकुमार आत्राम,तर उपशहरप्रमुख नजीर शेख ,अहेरी उपतालुकाप्रमुख : रूपेश बंदेला तर विभागप्रमुख पदी सचिन सलामे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला मिंटूभाई सय्यद, संजू फुलोर, महेंद्र गंजीवार, रोशन गोडसेलवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.